मुंबई : मराठा आंदोलनात राज्यभर झालेल्या जाळपोळ आणि तोडफोडनंतर अनेक तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. तर दुसरीकडे सरकार बंद दरम्यान झालेल्या नुकसानीची भरपाई वसुल करणार का अशी चर्चाही सुरू झाली आहे. बंद किंवा आंदोलना दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान आयोजकांकडून वसूल करण्याचा कायदा आहे. मात्र या ठिकाणी आयोजक म्हणून कुणाला जबाबदार धरायचे असा प्रश्न आहे. 


दुसरीकडे सरकार झालेल्या नुकसानासाठी स्थानिक आयोजकांना जबाबदार धरू शकते. मात्र ज्या प्रकारे मराठा समाज आक्रमक आहे तसंच सरकारवर त्याची असलेली नाराजी लक्षात घेता सरकार हे पाऊल उचलेल का असाही प्रश्न आहे. यापूर्वी भीमा-कोरेगावच्या घटनेत झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत सरकारने काहीही केलं नव्हतं.