मुंबई : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत पोलीस पर्यटकांसोबत कसे वागतात याचा एक प्रकार सोशल मीडिया वर समोर आला आहे, परराज्यातील आलेल्या पर्यटकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचा हा व्हीडिओ व्हायरल झाला आहे, दोनशे रुपये मागितल्यावर त्याची पावती मिळत नाही असे हि हा पोलीस बोलतोय असं व्हीडिओ मध्ये स्पष्ट दिसतंय, तर इतक्या उन्हात आम्ही कशासाठी उभं आहोत असा उलटप्रश्न करताना  पोलीस दिसत आहे. हा प्रकार खुलताबाद मध्ये झालाय, याच पद्धतीने पर्यटकांना लुटत राहिले तर पर्यटक येतील का असा प्रश्न आहे, दरम्यान हा व्हीडिओ व्हायरल झाल्यावर व्हीडिओ मध्ये दिसणाऱ्या या पोलिसाला  पोलीस अधीक्षकांनी निलंबन केल्याचेही समजतय.