नागपूर : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले चालकच मद्यधुंद अवस्थेत स्कूलबस चालवत असल्याची धक्कादायक बाब नागपुरात वाहतूक पोलिसांच्या कारवाईत समोर आली . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मद्यप्राशन करून स्कूलबस चालणा-यां चार चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईत केल्यानंतर पुन्हा एकदा स्कूलबस,व्हॅनने जाणा-या विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  



क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहून नेणाऱ्या स्कूलबस, स्कूल व्हॅन आणि स्कूल ऑटोंविरुद्ध वाहतूक विभागातर्फे कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमे दरम्यान गेल्या तीन दिवसात 1529 स्कूलबस , व्हॅन व ऑटोवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. धक्कादायक म्हणजे चार स्कूलबसचालक मद्य प्राशन करून स्कूल बस चालवतांना सापडले आहे.