धक्कादायक ! पोलीस कॉन्स्टेबलची खलबत्त्याने ठेचून हत्या, घटनेने पोलीसही चक्रावले
पोलीसांनी या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतलं आहे
आतिष भोईर, झी मीडिया, कल्याण : पोलीस कॉन्स्टेबलची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. मुंबईच्या कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे यांची कल्याणमधील राहत्या घरी हत्या झाली आहे. प्रकाश यांची हत्या पत्नी आणि मुलीने केल्याचे उघड झाले आहे .
पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींना कोळशेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आह . भाग्यश्री हिचं तीन वर्षांपूर्वी लग्न झालं होतं मात्र भ्याग्यश्री सासरी नांदत नसल्याने बोरसे यांच्या घरात नेहमी वाद होत होते .याच वादातून काल पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री यांनी त्यांची हत्या केली .
नेमकी घटना काय?
कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक हिरा पन्ना अपार्टमेंटमध्ये प्रकाश बोरसे हे आपली पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री सोबत राहत होते प्रकाश बोरसे हे मुंबई येथील कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत होते. काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रकाश बोरसे घरी आले. त्यांचा पत्नी आणि मुली सोबत वाद झाला या वादातून दोघींनी खलबत्त्याने प्रकाश यांच्या डोक्यावर प्रहार करत त्यांना जखमी केलं.
या हल्ल्यात प्रकाश यांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यूनंतर दोघी घराचा दरवाजा बंद करून एका बाजूला बसून होते जवळपास चार तास दोघी घरात बसून होत्या. याची माहिती कल्याण कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांना मिळाली बशीर शेख यांनी पोलिसांचे एक पथक घटनास्थळी रवाना केलं पोलिसांनी दरवाजा तोडून घरात शिरले.
घरात प्रकाश यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाशेजारी या दोघी बसून होत्या पोलिसांनी या दोघींना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.