मालेगाव महानगरपालिका निकाल २०१७
मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर
LIVE अपडेट :
- दुपारी १.३० : मालेगावच्या सर्व जागांचे (८४) निकाल जाहीर
काँग्रेस - २८
राष्ट्रवादी - २०
शिवसेना - १३
भाजप - ९
एमआयएम - ७
जनता दल - ६
अपक्ष - १
- दुपारी १.३० : महापौर पराभूत झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका... हाजी इब्राहिम शेख पराभूत... प्रभाग क्रमांक १३ मधून काँग्रेसच्या उमेदवाराने केला पराभव
- दुपारी १.०५ : मालेगाव महापालिकेच्या ७६ जागांचे निकाल जाहिर...
काँग्रेस - २८,
शिवसेना - ११,
जनता दल - ६,
राष्ट्रवादी - २०,
भाजपा - ३,
एमआयएम - ७,
अपक्ष १
- दुपारी १२.५० : काँग्रेस - २८, शिवसेना - ११, जनता दल - ५, राष्ट्रवादी - १४, भाजपा - ३, एमआयएम - ६, अपक्ष १
- दुपारी १२.२० : मालेगावात मुस्लिमबहुल भागातून भाजपला नापसंती... २९ मुस्लिम उमेदवारांना भाजपनं दिली होती उमेदवारी
- दुपारी १२.०० : मालेगावमधील सर्वात श्रीमंत उमेदवार माजी उपमहापौर नरेंद्र सोनवने (भाजप) पराभूत... शिवसेनेच्या राजाराम जाधव यांनी केला पराभव
- सकाळी ११.५५ : मालेगाव महापालिका निकाल : शिवसेना ७, काँग्रेस १७, राष्ट्रवादी ८, भाजप ३, एमआयएम ६
- सकाळी ११.५५ : प्रभाग क्रमांक २० मधल्या चारही जागा काँग्रेसकडे
- सकाळी ११.५० : एमआयएमचे विजयी उमेदवार
प्रभाग क्रमांक १८ अ - मजीद हाजी
प्रभाग क्रमांक १८ ब - कुलसुमबी रफिक बेकरिवले
प्रभाग क्रमांक २१ मधल्या चारही जागा एमआयएमकडे
प्रभाग क्रमांक २१ अ - युनूस इसा
प्रभाग क्रमांक २१ ब - मोमीन रजिया साहिद अहमद
प्रभाग क्रमांक २१ क - रहिमा बाण मो इस्माईल
प्रभाग क्रमांक २१ ड - खालिद परवेज युनूस
- सकाळी ११.२० : प्रभाग क्रमांक २० मधून माजी आमदार रशीद शेख आणि माजी महापौर ताहेर शेख हे पति-पत्नी विजयी
- सकाळी ११.०० : प्रभाग १८ मध्ये दोन जागा एमआयएमकडे तर दोन जागांवर काँग्रेस
- सकाळी १०.५० : प्रभाग क्रमांक. १ मधून शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर
- सकाळी १०.४५ : प्रभाग क्रमांक ८ मध्ये शिवसेनेचे सखाराम घोडके आघाडीवर
- सकाळी १०.४० : काँग्रेस शहराध्यक्ष - माजी आमदार रशीद शेख आणि एमआयएम शहराध्यक्ष मलिक शेख यांच्यात चुरशीची लढत
- सकाळी १०.३३ : प्रभाग क्रमांक १८ अ एमआयएमचे हाजी माजिद युनूस ईसा आघाडीवर
- सकाळी १०.३२ : प्रभाग क्रमांक १८ ब काँग्रेसचे शेख रफिक शेख अफजल आघाडीवर
- सकाळी १०.३० : प्रभाग क्रमांक १८ क काँग्रेसचे हमीदा साहेब अली आघाडीवर
- सकाळी १०.२८ : प्रभाग १८ ड काँग्रेसचे इस्त्राईल खान इस्माईल खान आघाडीवर
- सकाळी १०.२५ : प्रभाग क्रमांक. १२ जनता-राष्ट्रवादी युतीचे कलीम दिल्यावर व जनता दलाचे बुलंद इक्बाल आघाडीवर
- सकाळी १०.२० : प्रभाग क्र. ११ क काँग्रेस व एमआयएम उमेदवारांमध्ये चुरस
- सकाळी १०.१५ : प्रभाग क्रमांक. १८ अ एमआयएमचे उमेदवार अब्दुल माजिद आघाडीवर
- सकाळी १०.०० : मालेगाव महापालिका निवडणूक : पाच मतमोजणी केंद्रावर मतमोजणीला सुरुवात
- प्रभाग क्रमांक १९ क मधून काँग्रेस उमेदवार किशोरीबी अश्रफ कुरेशी बिनविरोध विजयी... एनसीपी उमेदवार मेहराजबी रशीद यांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट
नाशिक : मालेगाव महापालिका निवडणुकीसाठीही आज मतमोजणी होते आहे. महापालिकेच्या ८३ जागांसाठी ६० टक्के मतदान झालं असून ३७६ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे. सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
आयटीआय कॅम्प, शिवाजी जिमखाना, जाखोटीय भवन, तालुका क्रिडा संकुल, कृष्णा लॉन्स आशा पाच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. शिवसेना,भाजप काँग्रेस व एमआयएम स्वतंत्र निवडणूक लढवली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनता दलाने आघाडी केली आहे.