रत्नागिरी : डाव्या पायाची शीर तुटल्याने शस्त्रक्रिया झाल्यानंतर घरी विश्रांती घेत असलेल्या आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची असल्याने या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना भास्कर जाधवांची काळजी अधिक असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमासाठी जाधव कोल्हापूरला गेले असताना त्यांच्या पायाला दुखापत झाली डॉक्टरांनी जाधव यांना दोन महिने आराम करण्याचा सल्ला दिलाय. त्यांनतर राजकीय पुढाऱ्यांनी जाधव यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यास सुरुवात केली. शिवसेनेकडून प्रथम म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांच्या तबेतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी देखील भास्कर जाधव यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. 


कालच शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत आणि आमदार सदानंद चव्हाण यांनी जाधवांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यामुळेच भास्कर जाधव यांच्या तब्येतीची काळजी शिवसेना-भाजपला अधिक असल्याचं जाणवत आहे.