Maharashtra Election 2024 : मतदान संपल्यानंतर आता सगळ्यानाच निकालाची उत्सुकता लागलीय. निकालानंतर कुणाचं सरकार येईल हे  स्पष्ट होईल. या निकालापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुती आणि महाविकास आघाडीकडून लहान पक्ष तसेच अपक्षांशी संपर्क करण्यात येतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभा निवडणूक निकालांचं काऊटडाऊंन सुरू झालं असून राज्यात वेगानं राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्तास्थापनेसाठी काही जागा कमी पडण्याची शक्यता झाल्यास पर्यायी प्लान तयार करण्यात येतोय. आतापासून  फोनाफोनी सुरु करण्यात आलीय.  लहान पक्ष आणि निवडून येऊ शकणा-या आमदारांना आपल्याकडे वळवणं सुरु झालं. 


संजय राऊत काय म्हणाले? 


विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सर्वच पक्षाचे नेते वेगवेगळ्या प्रकारचा दावा करत आहेत. सत्ता असते तिथं अपक्ष जातात. काही अपक्षांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 


महायुतीची सत्ता येणार


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर अनेक पक्ष सतर्क झाले आहे. काही नेत्यांनी महाराष्ट्रात कोणते सरकार येणार हे देखील सांगितले आहे. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता शंभर टक्के येणार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलाय. मात्र, शेवटच्या क्षणी जोखीम नको म्हणून अपक्षांशी संपर्क सुरू असल्याची माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.


अपक्षांमधील नेत्यांची भूमिका काय? 


प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेच्या निकालाआधीच आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलीय. सत्ता स्थापन करणाऱ्यांसोबत जाऊ अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली होती. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीनं बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांना संपर्क साधलाय. हितेंद्र ठाकूर यांनी देखील सत्तेत जाण्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. 


सांगोला विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी महायुती आणि महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती दिलीय. महायुती आणि महाविकास आघाडीने प्रहार पक्षाचे बच्चू कडू यांच्याशीही संपर्क साधला आहे. मात्र, बच्चू कडू यांनी निकालाचे कल हातात आल्यानंतरच आपला निर्णय जाहीर करू, अशी भूमिका घेतली आहे.