कैलास पुरी, झी मीडिया पिंपरी चिंचवड 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरूर लोकसभा रणसंग्रामात राजे अमोल कोल्हे ' यांनी विजयश्री खेचून आणल्यानंतर भोसरी परगण्यात वातावरण आनंदमई झाले होते....! अमोल  कोल्हे यांच्या विजयात आपल्या सर्वांचे कोण कष्ट असल्याच्या समाधानाने उधोव सेनेचे नेते कार्यकर्ते आनंदात होते....! सुलभा उबाळे महलाच्या प्रांगणात आराम खुर्चीवर बसून गालातल्या गालात हसत होत्या...! काही दिवसांवर येवून ठेपलेल्या विधानसभा रणसंग्रामात उधोव सेने कडून आपल्याला रणसंग्रामात उतरण्याची संधी मिळणार आणि आपण  उधोव साहेबांच्या आणि बारामतीच्या थोरल्या साहेबांच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणणार या विचाराने सुलभा आणखीच हरखून गेल्या आणि आनंदाने त्यांनी उडीच मारली.....! 


 तिकडे धनंजय अलहाट ही चांगलाच भारावून गेला होता..केल्या कष्टाचे चीज झाले आणि शिरूर मध्ये अमोल कोल्हे विजयी झाले या विचाराने त्यांचा उर आनंदाने भरून आला...आता विधानसभा रणसंग्रामात लढाईला उतरायला काही दिवसच राहिलेत आणि विजय हा आपलाच या नुसत्या विचाराने धंनजय उल्लासित झाला. या वेळी सुलभा ताईने आपल्याला पाठिंबा दिलाय त्यामुळे अडचण नसल्याच्या विचाराने धंनजय आनंदाने उड्या मारू लागला....! 


शिरूर पराभवामुळे भोसरी परगण्यातील घड्याळ प्रांताचे शिलेदार काहीसे निराश झाले...पण भोसरीतील ज्येष्ठ श्रेष्ठ विलास लांडे आपल्याला वारसदार केले असल्याने आता आपल्याला काही तरी हालचाल करावी लागेल हा विचार अजित गव्हाणे यांच्या मनाला शिवला आणि त्यांनी थेट विलास लांडे यांचा महल गाठला....! धीर गंभीर होत विचार करत विलास लांडे यांनी सुस्कारा सोडला आणि अजित तू हो पुढं मी येतो मागून अस सांगत भोसरीचा घड्याळ प्रांत पुरता खाली करत मोठ्या साहेबांच्या तुतारी प्रांतात पाठवला....आता भोसरी विधानसभा रणसंग्रामात विजय आपलाच या विचाराने अजित गव्हाणे ही आनंदाने डोलू लागला...! 


भोसरी विधानसभा रणसंग्रमाच्या विजयाच्या स्वप्ने पाहत तयारी करू लागलेल्या सुलभा धंनजय आणि अजित यांना अचानक धक्काच बसला.....भोसरी रणसंग्रामात तिघांचा ही पत्ता कट होत विलास सेठ यांना उतरवण्याची घोषणा झाली आणि तिघांनी डोक्यावर हात मारला.....! भरल्या डोळ्यांनी अजित ने सेठकडे पाहिले आणि तूच माझा वारस पण उमेदवार मीच असं म्हणत विलास सेठ निघून गेले....! 


भोसरी विधानसभा रणांगणात कोण समोर येणार याचा विचार करत बसलेल्या कमळ प्रांताच्या राजे महेश यांना विलास सेठ यांच्या नावाची घोषणा झाल्याची वार्ता कानावर पडली आणि राजे महेशने चाणक्याकडे पाहत स्मित हास्य केले आणि महलाकडे रवाना झाले...!