पुणे : ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. जिल्हातील बारा तालुक्यांतील ९७ ग्रामपंचायतींसाठी आज निवडणूक होत आहे. 


दोन ग्रामपंचायत बिनविरोध


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिल्हातील ९९ ग्रामपंचायतींची मुदत जानेवारी - फेब्रुवारी २०१८ ला संपत आहे. त्त्यानुसार निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. ९९ पैकी बारामती तालुक्यांतील सायबांची वाडी तसेच मावळमधील उडेवाडी या दोन ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 


राष्ट्रवादीचे प्राबल्य पण...


९७ ग्रामपंचायतींपैकी १३ गावच्या सरपंच पदाच्या आणि सदस्यपदाच्या ३०४ जागा बिनविरोध झाल्या आहेत. जिल्ह्यातील इंदापूर वगळता सर्व तालुक्यांमध्ये निवडणूका होत आहेत. पुणे जिल्ह्यात आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राबल्य आहे. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. 


राजकीय चिन्हावर नाही तर पॅनेलला महत्व


ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षांच्या चिन्हावर होत नसल्या तरी त्यात पॅनेल्सच्या माध्यमातून विविध राजकीय पक्ष ताकद अजमावत असतात. महत्वाचं म्हणजे सरपंच पदाचा उमेदवार कुठल्या ना कुठल्या पक्षाचा असतो. त्यामुळे या ग्रामपंचायत निवडूकांनाही राजकीय महत्व प्राप्त झालय. अशा परिस्थितीत पुणे जिल्हयात काय चित्र उभं राहतं याबद्दल उत्सुकता आहे.