वाशिम : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी (Pooja Chavan Suicide Case)  आरोप झाल्यावर गायब झालेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड (State Minister Sanjay Rathod)  बंजारा समाजाच्या पोहरादेवी (Poharadevi Gad) गडावर येत आहेत. राठोड यांचा शासकीय दौरा असल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष पोहरादेवीकडे लागलं आहे. संजय राठोड हे साडेअकरा वाजता पोहरादेवीला येतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संत सेवालाल महाराज, संत बाबनलाल महाराज, जगदंबा मातेचं दर्शन घेतल्यावर ते दुपारी १ वाजता दारव्हा तालुक्यातील धामनगाव देव इथल्या श्रीक्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थानकडे निघतील. दुपारी अडीच वाजता मुंगसाजी महाराज देवस्थानात दर्शन घेतल्यावर ते साडेचार वाजता यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतील. त्यानंतर यवतमाळ निवासस्थानी थांबतील.



पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर वनमंत्री संजय राठोड हे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. संजय राठोड आज पोहरागडावर दाखल होणार आहेत. संजय राठोड कुठे आहेत आणि कसा असेल त्यांचा आजचा दौरा याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.