दोन चिमुकलींसह आईची गोदावरी नदीत उडी
आईची 2 मुलींसह नदीत उडी
नांदेड : दोन लहान मुलींसह आईने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी इथली ही घटना आहे. तिघांपैकी ३ वर्षांच्या सुविद्या कांबळे हिचा मृतदेह सापडला आहे. तर ५ वर्षांची शिवानी कांबळे आणि या मुलींची ३५ वर्षीय आई पूजा कांबळे यांचा शोध सुरु आहे. मुलींसह स्वतःचंही जीवन संपवण्याचं एवढं टोकाचं पाऊल पूजा कांबळे यांनी का उचललं याचा कारण मात्र समजलेलं नाही.