शिर्डी : जगभरात लोकांना फसवणून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत. असाच एक प्रकार शिर्डीतून समोर आला आहे. व्हि़डिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना अकोले पोलिसांनी अटक केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी महिला आणि तिचा सहकारी यांनी तक्रार करणाऱ्या व्यक्ती विरोधात कटकारस्थान रचले. शरीरसंबधाचे अमिष देऊन महिलेसोबत शरीरसंबध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर यांचा खरा खेळ सुरु झाला. हा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन या आरोपींनी दोन लाख रुपयांची खंडणी मागितली.


तक्रारदारने आरोपी यांना पैसे न दिल्याने आरोपी यांनी तक्रारदाराला मारहाण ही केली. व्हिडीओ क्लीप व्हायरल करण्याची धमकी देत आधी तीस हजार रुपये या तक्रारदाराकडून उकळले. त्यानंतर मात्र पुन्हा पैसे घेण्यासाठी आलेले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात सापडले.