कर्तव्याचे पालन करण्यासाठी स्कूटीवरुन 7 तास एकटीने प्रवासकरुन नागपूरला पोहोचली महिला डॅाक्टर
कोरोना व्हायरसमुळे बाधीत झालेल्या रुग्ण संख्येमुळे देशभरात दररोज नवीन उचांकाची नोंद होत आहे.
बालाघाट : कोरोना व्हायरसमुळे बाधीत झालेल्या रुग्ण संख्येमुळे देशभरात दररोज नवीन उचांकाची नोंद होत आहे. डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आणि सर्व कोरोना योद्धा यांच्यावरील दबाव देखील दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या अशा धोकादायक परिस्थितीत ते त्यांच्या स्वत:च्या जीवाची परवा न करता लोकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच बालाघाटच्या एका महिला डॉक्टरने सेवा आणि परोपकाराचे एक उदाहरण सगळ्यां समोर ठेवले आहे. तिने आपली कर्तव्य बजावण्यासाठी महाराष्ट्रातून नागपूर पर्यंतचा प्रवास स्कूटीने पूर्ण केला.
प्रज्ञा घरडे असे या महिला डॅाक्टरचे नाव आहे. या डॉक्टरने कोव्हिड केअर सेंटरमध्ये आपली ड्यूटी करण्यासाठी आपली स्कूटी चालवून महाराष्ट्रातून नागपूरात गेली. नागपुरातील खासगी रुग्णालयाच्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये काम करणारी डॉ. प्रज्ञा सुट्टीसाठी महाराष्ट्रातील तिच्या घरी आली होती.
देशभरात वाढत्या कोरोना संसर्गामुळे तिला सुट्टीच्या काळातही आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी नागपुरात परत जाणे आवश्यक होते. परंतु लॉकडाऊनमुळे तिला महाराष्ट्रातून नागपूरला जाणारी बस किंवा ट्रेन मिळाली नाही. त्यानंतर प्रज्ञाने तिच्या स्कूटीवरूनच नागपूरला जाण्याचा निर्णय घेतला.
नागपूरला जाण्यासाठी 7 तासाचा प्रवास
डॉक्टर प्रज्ञाच्या कुटुंबीयांना तिला एकटीला स्कूटीने इतक्या लांब जाऊ द्यायचे नव्हते. पण प्रज्ञाची जिद्दं आणि कर्तव्या समोर त्यांना ते मान्य करावे लागले. प्रज्ञा सकाळी स्कूटीवरुन नागपुरला निघाली आणि दुपारी तेथे पोहोचल्यानंतर लगेचच तिने कोव्हिड रूग्णांवर उपचार करायला सुरु केले. प्रज्ञाने सांगितले की, बालाघाट ते नागपूर असा सुमारे 180 किलोमीटरचा प्रवास स्कूटीने करण्यासाठी तिला सुमारे 7 तास लागले.
ती म्हणाली की, कडक उन्हामुळे आणि उष्णतेमुळे थोडी गैरसोय झाली होती. वाटेत काही खायला किंवा प्यायलाही नव्हते. डॉ. प्रज्ञा नागपुरातील एका कोव्हिड रुग्णालयात 6 तास सेवा देते. याशिवाय ती संध्याकाळी दुसर्या एका रुग्णालयात देखील सेवा देते. यामुळे तिला दररोज पीपीई किट घालून 12 तासांपेक्षा ही जास्त काळ काम करावे लागत आहे.