सचिन कसबे / पंढरपूर : Pandharpur khadde Andolan : रस्त्यावर खड्डे पडल्यानंतर अनेक आंदोलने पाहिली असतील. याआधी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्ष लागवड करण्यात आली आहे. मात्र, खड्ड्यातील रस्ते बुजविण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले.  चक्क रस्त्यावरील खड्ड्यांना साडी-चोळीचा आहेर देत प्रशासनाचा ग्रामस्थांनी निषेध केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंढरीतील ऐतिहासिक असलेल्या जुन्या दगडी पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यांबाबत महर्षी वाल्मिकी संघाकडून शासनाला साडी चोळीचा आहेर देत प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.


आषाढी वारी आता काही दिवसांवर आली आहे. या पुलावरुन हजारो भाविक वारीमध्ये 65 एकर ते पंढरपूर ये-जा करतात. या पुलावर मोठे मोठे खडे पडले आहेत.  त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. याला जबाबदार कोण असा सवाल महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी शासनाला विचारला आहे.


पुलावरील पडलेल्या खड्याला साडी चोळी घालून झोपलेल्या प्रशासनाला जाग येण्यासाठी आणि शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले. हा रस्ता दुरुस्तीसाठी नवीन प्रस्ताव तयार करण्यात यावा यासाठी हे आंदोलन केले.