नागपूर: मुंबई-गोवा महामार्गावरचे सगळे खड्डे 15 ऑगस्टपर्यंत बुजवण्यात येतील, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबई-गोवा महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे हा अक्षरशः मृत्यूचा सापळा झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 याचसंदर्भात झी २४ तासनं मुंबई-गोवा महामार्गाचा पंचनामा ही विशेष मालिकाही सुरू केली आहे. त्याची दखल घेत सरकारने ही घोषणा केली.


१३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरु होत आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची गर्दी प्रचंड वाढणार आहे. त्यापूर्वी १५ ऑगस्टपर्यंत सगळे खड्डे बुजवणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.