अलिबाग : रायगड जिल्हयात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.. पहिल्याच पावसात जिल्हयातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पार दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढलाय.


पनवेल ते वडखळ दरम्यान रस्त्यात ठिकठिकाणी खडडे पडले असून या खडडयांतून वाहने चालवणे जिकीरीचे झाले आहे. खडडे चुकवण्याच्या नादात वाहनांना अपघात होत आहेत. एकीकडे महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले असताना दुसरीकडे खडडयांचे साम्राज्य पसरले आहे.