Western Railway MegaBlock: पश्चिम रेल्वेकडून (Western Railway) अतुल आणि वलसाड दरम्यान दोन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गुरुवारी 24 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.25 ते 1.25 वाजेपर्यंत वलसाड (Walsad) आरओबीच्या 36 मीटर कंपोझिट गर्डरच्या लाँचिगसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळं अनेक गाड्या रद्द आणि नियमित केल्या जाणार आहेत. (Western Railway MegaBlock Update)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई लोकलही (Mumbai Local) लाइफलाइन म्हणून ओळखली जाते. लोकलसेवा विस्कळीत झाल्यास किंवा उशीराने आल्यास मुंबईकरांच्या संपूर्ण दिवसाचे वेळापत्रक कोलमडते. अशातच ऐन गुरुवारी पश्चिम रेल्वे ब्लॉक घेत असताना नोकरदारांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ब्लॉकची वेळ जरी कार्यालयीन वेळेत नसली त्याचा थोडाफार फटका पश्चिम रेल्वेला बसणार आहे.


पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09154 वलसाड-उमरगाव मेमू आणि ट्रेन क्रमांक 09153 उमरगाव- वलसाड मेमू या दोन गाड्या रद्द करण्यात येणार आहे. तर, काही गाड्या उशीराने धावणार आहेत. 


ट्रेन क्रमांक 09724 वांद्रे टर्मिनस- जयपूर विकली स्पेशल 55 मिनिटांनी, ट्रेन क्रमांक 19015 दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्स्प्रेस 35 मिनिटांनी, ट्रेन क्रमांक 12926 अमृतसर- मुंबई सेंट्रेल एक्स्प्रेस 1 तास 40 मिनिटांनी नियमित केली जाईल. तर, ट्रेन क्र 22954 अहमदाबाद- मुंबई सेंट्रल गुजरात एक्स्प्रेस 1 तास 30 मिनिटांनी वेगवेगळ्या स्थानकांवर नियमित केली जाईल. 


दरम्यान, कसारा स्थानकात आता सहा नव्या गाड्यांना थांबा देण्यात आला आहे. आज 23 ऑगस्टपासून एलटीटी शालिमार एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड तपोवन एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई जालना जनशताब्दी एक्स्प्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस ते पाटणा एक्स्प्रेस, छत्रपती शिवाजी महाराज स्थानक, मुंबई ते नांदेड राज्यराणी एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.