मुंबई : Power Crisis in Maharashtra : राज्यावर गंभीर वीजसंकट आहे असा इशारा ऊर्जामंत्र्यांनी दिलाय. उष्णतेमुळे मागणी वाढलेली असताना औष्णिक वीजप्रकल्पांमध्ये भीषण कोळशाची टंचाई आहे. कोराडी वीजप्रकल्पात केवळ 1 दिवसांचाच साठा आहे. त्यामुळे राज्यावर अंधाराचे गडद संकट दिसून येत आहे. लोडशेडिंगला सामोरे जावे लागणार आहे. राज्यात काही ठिकाणी काल रात्रीपासून विजपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे आधीच उकाड्याने हैराण झालेले नागरिक त्रस्त झालेत. ( Maharashtra staring at power crisis due to dip in generation amid cut in coal supply and limited stock with generation plants)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कोल इंडियाकडून अपुरा कोळसा पुरवठा होत आहे. महानिर्मितीच्या कोयना जलविद्युत प्रकल्पातूनही पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती करावी लागत असल्याने पाण्याचा साठाही वेगाने कमी होत आहे. 1 हजार मेगावॉटची वीजटंचाई भासण्याची शक्यता आहे. राज्याला तातडीने वीजखरेदी सुरू करावी लागणार आहे. अन्यथा राज्यावर अंधाराचे संकट उभे ठाकले आहे.


वीजटंचाईसाठी आज मंत्र्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. वीजखरेदी करण्याचा ऊर्जाविभागाचा प्रस्ताव तयार आहे. कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड या टाटा पॉवरच्या 4 हजार मेगावॉटच्या वीजप्रकल्पातून उन्हाळ्यासाठी वीज मिळू शकते,अशी माहिती उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. आज त्यावर बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.