नांदेड : दारूच्या नशेत बापाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीला भिंतीवर आपटले. गंभीर जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात ही घटना घडली. 37 वर्षीय प्रभाकर इंगळे याला दारूचे व्यसन आहे.16 ऑक्टोबर रोजी दुपारी तो नेहमीप्रमाणे दारू ढोसून आला. दारूच्या नशेत त्याने पत्नीशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी दोन वर्षाची अनुराधा तथा अंजली आईच्या कडेवर होती. अंजलीला आईकडून हिसकावून घेऊन तो निघून गेला. गावातील ग्रामपंचायत इमारतीच्या भिंतीवर त्याने अंजलीला भिंतीवर आपटले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीच्या डोक्याला जबर मार लागल्याने अंजली बेशुद्ध पडली. तिला हिमायतनगरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. ती कोमात गेल्याचे डॉक्टरानी सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने अंजलीला नांदेडला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णवाहिकेतून नांदेडला उपचारासाठी आणताना अंजलीचा मृत्यू झाला.


यावेळी आई अर्चना इंगळे हिने स्वत:हून फोन करून ही संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. हिमायत नगर पोलिसांनी तातडीने अर्जना इंगळे हिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आरोपी बाप प्रभाकर इंगळे याला पोलिसांनी अटक केली आहे.