Pradhan Mantri Matritva Vandana Yojana in Marathi: सरकारकडून अनेक योजना चालवल्या जातात. यात महिलांसाठीही सरकारने काही योजना (Government Schemes) सुरू केल्या आहेत. या योजनेंतर्गंत महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. अशातच सरकारची एक योजना आहे ज्यामुळं गर्भवती मातांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. केंद्र सरकारने मातृत्व वंदन योजना लागू केली आहे. महाराष्ट्रातही ही योजना राबवली जाते. पंतप्रधान मातृत्व योजना महिला आणि बाल विकास मंत्रालय व समाज कल्याण विभागामार्फत राबवली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मातृत्व योजनेसाठी पात्र महिलांना हफ्तांमध्ये ही रक्कम दिली जाते. केंद्र सरकारकडून ही रक्कम दिली जात असून महिलेच्या कुटुंबातील इतर सदस्य या योजनेचा व मिळालेल्या रकमेचा फायदा घेऊ शकत नाहीत. देशभरात कुपोषण हा विषय गंभीर आहे. कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून मातृत्व वंदन योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. याअंतर्गंत सरकारकडून गर्भवती महिलांना आर्थिक मदत पोहोचवली जाते. 


सरकार 6000 रुपये मुलांच्या पोषणासाठी व आजारपणासाठी ही रक्कम वापरण्यास देतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गर्भवती महिलांचे वय 19 वर्षांपेक्षा जास्त पाहिजे. मातृत्व वंदन योजनेची सुरुवात 1 जानेवारी 2017 रोजी झाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज द्यावा लागणार आहे. अर्ज दिल्यानंतर गर्भवती महिलांना तीन टप्प्यात रक्कम दिली जाते.  शेवटच्या टप्प्यात महिलेने बाळाला जन्म दिल्यानंतर 1000 रुपये महिलेच्या खात्यात जमा होतात. 


या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसऱ्या टप्प्यात 2000 रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात 2000 रुपये गर्भवती महिलांना दिले जातात. केंद्र सरकारकडून मिळणारी ही रक्कम थेट गर्भवती महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केली जाते. तसंच, या योजनेसाठी तुम्हाला काही माहिती हवी असल्यास  7998799804 या हेल्पलाइनवर फोन करु शकता. इथे तुमच्या सर्व शंकांचे निसरन केले जाईल. 


अर्ज कसा करता येईल?


या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana वर जाऊन योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. येथून फॉर्म डाउनलोड करुन अर्ज करु शकता किंवा संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करु शकतात. 


कोण करु शकतं अर्ज


या योजनेंतर्गंत अर्ज करण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय 18 ते 55 वयोगटात असलं पाहिजे. महिला लाभार्थ्यांना अधार कार्डहे दस्तावेज द्यावे लागेल. तसंच, दुसरे अपत्य झाल्यानंतर 270 दिवसात अर्ज करता येणार आहेत. योजनेसाठी बाळाच्या पित्याच्या आधार कार्डाची अट रद्द केली आहे.