दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दिल्लीत नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडली होती. मात्र, यावेळी भागवतांनी सर्वांची फसवणूक केल्याचा आरोप भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. मोहन भागवत यांनी लोकांना पुन्हा फसवण्यासाठी आणि आम्ही बदललो आहोत, हे दाखवण्यासाठी इतर पक्षाच्या नेत्यांना बोलावले होते, असा आरोप आंबेडकर यांनी केला. 
 
 गोळवळकर गुरुजींचे 'वी ऑर अवर नॅशनलहूड' हे पुस्तक संघासाठी वंदनीय आहे. या पुस्तकात सर्वांनी हिंदू धर्म स्वीकारलाच पाहिजे, संघ सर्वोच्च असून संविधान दुय्यम आहे आणि वंदे मातरम हे देशाचे राष्ट्रगीत असावे, असे अनेक वादग्रस्त विचार मांडण्यात आले आहेत. मात्र, भागवतांनी कार्यक्रमात या पुस्तकातील मजकुराचे कोणत्याही प्रकारे खंडन केलेले नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.