Prakash Ambedkar News : औरंगाबादच्या नामांतराविरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु आहे. संभाजीनगरमध्ये (sambhajinagr) MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो (aurangzeb photo) झळकल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो झळकावणा-यांवर गुन्हा दाखल झाला आहे. फोटो झळकावणा-या चौघांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. त्यातच आता  बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी यावर प्रतिका देताना औरंगजेब या मातीलले नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगजेब या मातीलले नाहीत का? असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब वादावर प्रतिक्रिया दिली आहे. MIMच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो नाचवण्यात आल्याबद्दल आंबेडकरांना विचारलं असता. तो फोटो असणं आपल्याला नवीन वाटत नाही असं आंबेडकर यांनी म्हंटल आहे. 


औरंगजेब या मातीतले नाहीत का? त्यांचा जन्म मोगल सल्तनात मध्येच झाला ना असे आंबेडकर म्हणाले. फोटो लावले म्हणून मला काही नवीन वाटत नाही. ज्यांना हिंदू मुस्लिम याच्या मध्ये विभाजन घालायचे आहेत ते असं बोलत असावेत. जात, धर्म राजकारण झालं की प्रादेशिक मुद्दे घेऊन राजकारण करतात. 


दरम्यान, संभाजीनगरमध्ये औरंगजेबाचा फोटो झळकावणा-यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. शहरातल्या सिटी चौक पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.  काल एमआयएमच्या उपोषण आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकावण्यात आले होते. दोन समाजात तेढ निर्माण करणं, धार्मिक भावना भडकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. ज्यांनी फोटो झळकवले, त्या चार तरुणांचा शोध घेतला जात आहे.


औरंगजेबाचे फोटोबाबात जलील यांचा खुलासा


औरंगजेबच्या फोटोवरुन टीका सुरू झाल्यानंतर एमआयएम कडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचा आंदोलन चिरडण्यासाठी आम्हाला बदनाम करण्यासाठी कुणीतरी आमच्या आंदोलनात हा फोटो झळकावल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला. फोटो झळकावणाऱ्याची आम्ही कडक शब्दात निंदा करतो असेही इम्तियाज जलील म्हणाले.