रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षांचा 2021चा निकाल जाहीर झाला आहे. मुलांमधून सांगलीचा (sangali) प्रमोद चौगुले (Pramod Chowgule) राज्यात  प्रथम आला आहे. तर, मुलींमधून सोनाली मेत्रे राज्यात पहिली आहे. या परीक्षेत मात्र, प्रमोद चौगुले याने नवा इतिहास रचला आहे. MPSC परीक्षेत सगल 2 वेळा राज्यात प्रथम येणाऱ्या तो राज्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वडिलांसारखो तो ड्रायव्हर बनला नाही तर त्याने कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर अनोखं यश मिळवले. परिस्थितीवर मात करत त्याने अभूतपूर्व कामगिरी केली आहे. त्याच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.    


MPSC परीक्षांचा 2021चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सांगलीचा प्रमोद चौगुले एमपीएससी परीक्षेत राज्यात पहिला आला आहे.  2020 आणि 2021 अशा सलग दोन्ही वर्षी राज्यात टॉपर येणारा प्रमोद राज्यातील एकमेव विद्यार्थी ठरला आहे. 


एमपीएससीचा निकाल लागला आणि सांगली जिल्ह्याच्या बाबतीत एक अलौकिक इतिहास घडला. सांगलीचा प्रमोद चौगुले हा दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला. 2020 च्या परीक्षेत ही तो राज्यात पहिला आला होता. त्यावेळी त्याची उद्योग उपसंचालक म्हणून निवड झाली होती. 


यावर तो समाधानी नव्हता. प्रमोदचं स्वप्न काही तरी वेगळचं होते. पोलीस खात्यातील डीवायएसपी या पदाचे त्याला आकर्षण होते. त्यामुळे आता मिळालेल्या यशावर तो खूश नव्हता. म्हणून प्रमोदने पुन्हा 2021 ला एमपीएससीची परीक्षा दिली आणि तो आणखी एकदा राज्यात पहिला आला आहे. असा इतिहास घडवणारा प्रमोद हा महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. ही अभिमानास्पद गोष्ट आहे.


एमपीएससीच्या यंदाच्या निकालाने सांगलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात पहिला क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. गेल्या वेळी सुद्धा तो राज्यात पहिला आला होता. यावर्षीही तो राज्यात पहिला आला आहे अशी कामगिरी करणारा प्रमोद एकमेव डबल महाराष्ट्र केसरी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


प्रमोद चौगुले आणि त्याचा परिवार हे सांगली जिल्ह्यातील सोनी या गावचे रहिवासी आहेत. प्रमोदचे वडील बाळासाहेब चौगुले यांचा टेम्पो चालवण्याचा व्यवसाय आहे. त्याची आई शारदा चौगुले या शिवणकाम करून संसाराला हातभार लावतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असताना प्रमोदने मिळवलेले यश हे कौतुकास्पद आहे.