Pravin Darekar On Manoj Jarange Patil :  मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात (Devendra Fadanvis) आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईला सागर बंगल्यावर येतो.. गोळ्या घाला, असं म्हणत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) मुंबईकडे रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीसांना आपला बळी घ्यायचाय. ते आपली बदनामी करतायेत. आता गोळ्या घातल्या तरी चालतील, मुंबईला जाणारच, असं म्हणत जरांगे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत. देवेंद्र फडणवीसांना आयुष्यातून उठवेन, असा इशाराही जरांगे पाटलांनी दिलाय. दरम्यान पत्रकार परिषद संपल्यानंतर जरांगे मुंबईकडे जाण्यासाठी आग्रही असल्यानं कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बराच वेळ याठिकाणी गोंधळ उडाला होता. एक बामण मराठ्यांना संपवायला निघालाय, असं म्हणत जरांगे यांनी फडणवीसांवर टीका केली होती. त्यावर आता भाजपचे नेते संतापले आहे. अशातच आता भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी जरांगेंना इशारा दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले प्रविण दरेकर?


मनोज जरांगे पाटील यांनी आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे. मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होते ते सरकारने दिले आहे. आता नेमकं जरांगेला काय हवे आहे? असा सवाल प्रविण दरेकरांनी विचारला आहे. मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून राजकारण करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही, असंही दरेकरांनी खडसावून सांगितलं.


तुमचा बोलविता धनी कोण आहे, हे महाराष्ट्राला नीट माहित आहे. फ्रस्टेशनपोटी जरांगे टोकाची भाषा करत आहेत. सरकारने, गृह खात्याने याची दखल घ्यावी. नाहीतर आम्हालाही सागर बंगल्यावर जशास तसे उत्तर द्यायला थांबावे लागेल, असं म्हणत प्रविण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. 



दरम्यान, फडणवीसांवर टीका करणं बंद करा, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना दिलाय. जरांगे यांच्या मागे पवार आहेत की जालन्यातली भय्या फॅमिली, असा सवालही लाड यांनी केलाय. तर जरांगेंनी फडणवीसांवर असे आरोप करणं असमर्थनीय असल्याचं शेलार यांनी म्हटलंय.