विरार : आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर केलेली जहरी टीकेच समर्थन करता येणार नाही. मात्र त्यांनी ही टीका का केली याचं संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बोलताना व्यक्त केलं. आतापर्यंत राष्ट्रवादीने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जातीयवादींच्या पिंजऱ्यात उभे केले. राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांबद्दल टीका करणे चुकीचं असल्याचे त्यांनी म्हटले. ते त्यांच वैयक्तीक मत असून ती पक्षाची भूमिका नव्हती. असं ही दरेकरांनी म्हटलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुजन समाजाच्या अत्याचारासंदर्भात भूमिका मांडणं हा उद्रेक शरद पवारांवरील टीकेला कारणीभूत ठरला. हे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी त्यावर विचार मंथन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.


आज वसई विरार शहरातील कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या, प्रशासकीय यंत्रणा व एकूण शहरातील परिस्थिती याचा धावता आढावा प्रवीण दरेकर यांनी घेतला.


शरद पवारांवर टीका करत असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा तोल घसरला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी अत्यंत खालच्या पातळीची टीका पडळकर यांनी केली आहे. पडळकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. पडळकर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.