काय सांगते पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांची कुंडली; ग्रह ताऱ्यांच्या रचनेतून मोठा उलघडा
Astrology Council : उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार त्यांचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे
Future of Political Leaders : राजकारणात (Politics) कधी काय होईल सांगता येत नाही. कधी एका रात्रीत सत्ता जाते तर कधी रातोरात सरकार तयार होतं. महाराष्ट्राचं राजकारणही (maharashtra politics) गेल्या काही वर्षांपासून ढवळून निघाल्याचे पाहायला मिळतय. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस (devendra fadnavis) यांचा पहाटेचा शपथविधी अनेकांना कायमच लक्षात राहिलाय. कॉंग्रेसचा (Congress) विरोध करणारी शिवसेना महाविकास आघाडीमध्ये अडीच वर्षे एकत्र सत्तेत होती. त्यानंतर शिवसेनेत आतापर्यंतची पडलेली सर्वात मोठी फूट आणि देवेंद्र फडणवीसांची पुन्हा सरकारमध्ये एन्ट्री. 40 आमदार आणि 12 खासदारांना घेऊन बाहेर पडून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली.
अगदी अनपेक्षितपणे घडलेल्या या सर्व घटना आहेत. पण आता या राजकारण्यांच्या भविष्याबाबत मोठी भविष्यवाणी करण्यात आलीय. संभाजीनगरमध्ये नुकतीच ज्योतिष परिषद झाली. यामध्ये सहभागी ज्योतिषींनी आगामी राजकारणावर आपली मतं व्यक्त केली आहेत. राज्यभरातून अनेक ज्योतिष मंडळींनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती. यावेळी अनेक रंजक भाकिते समोर आली आहेत. यातील वेदमूर्ती अनंत पांडव गुरुजी यांनी आगामी राजकारणाबाबत केलेली भविष्यवाणी चर्चेचा विषय ठरतेय.
योगी आदित्यनाथ
अनंत पांडव गुरुजी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कुंडलीत उच्च राजयोग असल्याचे म्हटले आहे. योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आहेत.
अरविंद केजरीवाल
दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांच्या कुंडलीत राजयोग असल्याचे पांडव गुरुजी यांनी म्हटले आहे. आपचे संयोजक असलेले अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सध्या विविध राज्यात आपली सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करतोय. पंजाबमध्ये सर्वांना आश्चर्यचकित करत आपने सत्ता स्थापन केली. नुकतीच दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीतही आपला बहुमत मिळाले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीत आपला अपेक्षित यश मिळाले नसले तरी केजरीवाल यांच्या पक्षाने राष्ट्रीय पक्ष होण्याचा मान मिळवलाय.
राहुल गांधी
अनंत पांडव यांनी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत मोठी भविष्यवाणी केलीय. राहुल गांधी यांच्या कुंडलीत राजयोग आहे. पण पंतप्रधान पदासाठी त्यांना अंतर्गत विरोधकांना सामना करावा लागतो, असे पांडव गुरुजी यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेनिमित्त कन्याकुमारी ते जम्मू काश्मिर असा प्रवास करत आहेत. सध्या ही यात्रा राजस्थानात असून तिथे मोठ्या प्रमाणात अंतर्गत वाद पाहायला मिळतायत. पण राहुल गांधी हा वाद शमवण्याचा प्रयत्न करताय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुंडलीमध्ये राजयोग असल्याचे पांडव यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांचे अनेक विरोधक तयार होतील पण त्यावर ते मात करतील असेही या भविष्यवाणीत म्हटले आहे. येणारी लोकसभेची निवडणुकीत पंतप्रधान मोदी आतंकवाद या विषयावर निवडणूक लढवणार आहेत. तर 2024 भाजपला 418 जागा मिळतील. नरेंद्र मोदी हे 2028 मध्ये त्यांच्यावरील जबाबदारी दुसऱ्याला देतील, असेही पांडव यांनी म्हटले आहे.
राज्यातील राजकीय भविषय
उद्धव ठाकरे
आता राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल, असे भविष्य अनंत पांडव यांनी वर्तवले आहे. काही महिन्यांपूर्वीच पक्षफूटीचा धक्का बसलेल्या उद्धव ठाकरेंना आणखी धक्के बसण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. उद्धव ठाकरे यांच्या कुंडलीनुसार त्यांचे सहकाऱ्यांसोबत मतभेद होतील. यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल, असे पांडव यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
दुसरीकडे नुकतेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतलेल्या एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीनुसार सध्याचा काळ भाग्योदयाचा आहे. एकनाथ शिंदे यांच्या कुंडलीत राजयोग आहे. मात्र पुढे ते मुख्यमंत्री होतील की नाही हे स्पष्ट नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही महत्त्वाची भविष्यवाणी करण्यात आलीय. देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीनुसार त्यांना पक्षांतर्गत भरपूर विरोध होणार आहेत. त्यामुळं त्यांनी सावध राहण्याची गरज आहे, असे पांडव यांनी म्हटले आहे.