पुणे : येरवडा कारागृहात कैद्याचा खून करण्यात आल्याची घटना घडलेय. दोन कैद्यांमधील भांडणात एकाचा मृत्यू झाला. आज सकाळची घटना ही घटना झाली. दरम्यान, खूनाचे वृत्त समजताच येरवडा पोलीस घटनास्थळी दाखल  झालेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 येरवडा कारागृहामध्ये हाणामारी झाली. यात एका कैद्याचा मृत्यू  झाला. कारागृहातील बी यार्डमध्ये हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे. बी यार्ड मध्ये गुन्हेगारी क्षेत्रातील कैदी होते. अपहरणाच्या गुन्ह्यात चार वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या सुखदेव मेघराज महापूर या कैद्याचा खून झालाय.


आरोपीचे नाव दिनशे दबडे (३५) असे असून तो हत्येच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.  तर  सुखदेव मेघराज महापूर (४३ ) असे हत्या करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. अपहरणाच्या गुन्ह्यात त्याला साडेतीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 


गेल्या सात महिन्यांपासून तो येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. आरोपी व हत्या करण्यात आलेला कैदी दोघेही एकाच बराकीमध्ये राहत होते. दोन्ही कैदी स्वयंपाक घरात काम करत होते. त्यांच्यामध्ये काही क्षुल्लक कारणावरून वादावादी झाली. यावेळी एका कैद्यानं दुसऱ्याचे लक्ष नसताना  पाठीमागून दगडाने हल्ला करुन त्याची हत्या केली.