CM Eknath Shinde in Sinnar : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं (Shirdi Saibaba) दर्शन घेतलं. दर्शनानंतर मुंबईकडे रवाना होणार होते. मात्र त्यांचा ताफा सिन्नरच्या मिरगावच्या (Sinnar Mirgaon) शिवारात अचानक वळल्याने एकच धावपळ सुरू झाली. तिथे श्री क्षेत्र श्री ईशान्येश्वर मंदिरात त्यांनी महादेवाची सपत्नीक पूजा केली. नाशिक शहरातील एक बड्या सुप्रसिद्ध राजकीय ज्योतिषी बाबाचे हे मंदिर आहे. त्याच्याकडून याआधीही मुख्यमंत्र्यांनी भविष्य जाणून घेतल्याची चर्चा असून आज त्याविषयी तोडगा काढण्यासाठी पूजा केल्याची चर्चा परिसरात रंगलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्ता बदल होण्यापूर्वी  मुख्यमंत्री शिंदे यांनी याच पद्धतीने अचानक हेलिकॉप्टरने जळगाव जिल्ह्यातील चोपडा इथल्या एका मंदिरात याच पद्धतीने दर्शन घेतलं होतं आणि तिथल्या पुजाऱ्याकडून आपलं भविष्य जाणून घेतलं होतं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि नियोजित बैठका असताना त्यांनी अचानक आज मुहूर्त साधत शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनाआड हा उपक्रम केल्याची शासकीय अधिकाऱ्यांमध्ये कुजबूज आहे.


अंनिसची टीका
नाशिक जिल्ह्यात एकेठिकाणी मुख्यमंत्री ज्योतिष पाहण्यसाठी गेले असल्याची चर्चा रंगतेय, हे जर खरं असेल तर ते अत्यंत वेदनादायी आहे, अशी टीका अंनिसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संविधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांचं हे वर्तन अत्यंत बेजबाबदारपणाचं असल्याचंही अंनिसने म्हटलं आहे. तसंच या कृतीचा अंनिसने निषेध व्यक्त केला आहे.