प्रकल्पग्रस्तांचा सिडकोविरोधात यल्गार
आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला. विमानतळ बांधकामासाठी सुरु असलेले मायनिंगचे काम मोर्चा काढून पुन्हा थांबवले गेले आहे.
नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी सिडको विरोधात मोर्चा काढला. विमानतळ बांधकामासाठी सुरु असलेले मायनिंगचे काम मोर्चा काढून पुन्हा थांबवले गेले आहे.
विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के भूखंड आणि संपूर्ण पुनर्वसन करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते. मात्र कुठल्याही आश्वासनाची पूर्तता न करता सिडकोनं मायनिंगच्या कामाला सुरुवात केल्यानं प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक झाला. विमानबाधित १० गावातील ग्रामस्थांनी याविरोधात एकत्र येत हा मोर्चा काढला.
यावेळी येत्या २५ तारखेपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासनं यावेळी सिडकोकडून देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी सिडकोला देण्यात आला आहे.