Maharashtra Land Rules : महाराष्ट्रात Agricultural आणि Non Agricultural अशा विभागांमध्ये भूखंडाची विभागणी करण्यात आली आहे. राज्यातील बऱ्याच नागरिकांकडे अशाच भूखंडांची मालकी, अधिकरही आहेत. पण, मुळात तुमच्याकडे किती जमीन असावी? कायदा याविषयी काय सांगतो? तुम्हाला ठाऊक आहे का? 


कायदा आणि त्यातील तरतुदी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रामध्ये एका व्यक्तीकडे किती शेतजमीन असावी यासाठीची कमाल मर्यादा, अधिक जमीन असल्यास त्या जमिनीची भूमिहीन- तत्सम व्यक्तींना योग्य वाटणी अशा तरतुदींसाठी  महाराष्ट्र शेतजमीन  अधिनियम, 1961 हा कायदा आखण्यात आला आहे. सिलिंग कायदा, म्हणूनही हा कायदा ओळखला जातो. वरील कायद्याअंतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटादार वर्ग 2 पद्धतीमध्ये मोडतात अशी माहिती मिळते. बीबीसीच्या वृत्तानुसार सरकारी परवानगीशिवाय अशा प्रकारच्या जमिनींचं हस्तांतरण करता येत नाही. 


हेसुद्धा वाचा : Nagpur News : चिमुकली शौचालयात जाताच तो नराधम मागून आला आणि... ; धावत्या रेल्वेत घडला धक्कादायक प्रकार


व्यक्तीच्या नावे किती जमीन असावी? 


सिलिंग कायद्यानुसार एका व्यक्तीच्या नावे किती जमीन असावी याची मर्यादाही निर्धारित करण्यात आली आहे. ज्यानुसार कोरडवाहू जमिनीसाठीची मर्यादा 54 एकर इतकी आहे. बारामाही पाणीपुरवठा नसूनही वर्षातून एकदा खात्रीशीर पाणीपुरवठा असणाऱ्या जमिनीसाठी ही मर्यादा 27 एकर इतकी आहे. हंगामी बागायत, भातशेतीची जमीन असल्यास 36 एकर जमीन आणि बारमाही पाणीपुरवठा, बागायत जमिनीसाठी 18 एकर जमीनीची मालकी एका व्यक्तीकडे असू शकते. 


लक्षात घेण्याजोग्या गोष्टी 


सिलिंग कायद्यानुसार मिळालेली जमीन एखाद्या औद्योगिक उपक्रमासाठी किंवा कृषितर प्रयोजनासाठी आवश्यक असेल तर, अनार्जित प्राप्तीच्या 75% रक्कम देऊ केल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून या हस्तांतरणास परवानगी दिली जाऊ शकते. मुळात या कायद्यानुसार जमीन हस्तांतरण करताना रक्कम अदा करण्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक असेल.