अंबरनाथ  : बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून इमारत पडण्याचा धोका निर्माण झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंबरनाथच्या नवरेनगर परिसरात काल रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या परिसरात एका बिल्डरने इमारत उभी करण्यासाठी खड्डा खोदला. मात्र  त्या  खड्ड्यामुळे बाजूच्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली आणि इमारतीखालची मातीही खचली. त्यामुळे या इमारतीला धोका निर्माण झालाय. एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असून इमारतीखालची माती खचली, तर संपूर्ण इमारतच कोसळण्याची भीती व्यक्त होतेय. या प्रकारानंतर अंबरनाथ पालिकेचे पदाधिकारी आणि नगरसेवक यांनी  या परिसराची पाहणी करत निष्काळजीपणा करणाऱ्या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी केलीये.



 दरम्यान, या बिल्डरला शेजारच्या इमारतीतल्या रहिवाशांनी वारंवार खोदकाम न करण्याबाबत बजावलं असल्याचा प्रकारही समोर आलाय. संरक्षक भिंत कोसळण्याची भीती असल्याचं सांगूनही बिल्डरनं इथे बेजबाबदारपणे खोदकाम केलं, त्यामुळे आता  या बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी धोक्यात आलेल्या इमारतीच्या रहिवाशांनी केलीये.   अशाच प्रकारची घटना काही दिवसांपूर्वीच मुंबईतही घडली होती. मात्र तरीही बिल्डरांना अद्याप या बाबत गाभीर्य  नसल्याचं पाहायला मिळतंय.