कल्याण : नेवाळी विमानतळाविरोधी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. त्याआधी पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळही झाली. काही ठिकाणी पोलीसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. स्थानिक आमदारांनी शांततेचं आवाहन करूनही शेतक-यांचा प्रक्षोभ कमी झालेला नाही. भाल गावात अखेर उग्र आंदोलकांना परत फिरवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याणजवळ विमानातळासाठी केंद्र सरकारानं जबरदस्ती जमीन संपादित केल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे. सरकारच्या जमिनी संपादनाविरोधात केलेल्या आंदोलनाला आज सकाळी हिंसक वळण लागलं. मालकीच्या जमिनीवर पेरणी करण्यास मज्जाव केल्यानं शेतक-यांचा संताप टोकाला गेल्याचं पुढे येतं आहे. आंदोलनादरम्यान शेतक-यांनी कल्याण-मलंगड रस्त्यावर टायर जाळून वाहतूकही बंद पाडली.