Buldhana Crime News : एकीकडे मोठ्या जल्लोषात भारताचा 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला. तर, दुसरीकडे समाज कंटक विचित्र कृती करताना दिसत आहेत. पुण्यात पाकिस्तान जिंदाबाद अशी नारेबाजी करण्यात आली. तर, बलढाणा येथे एका तरुणाने proud to be a pakistani अशी पोस्ट सोशल मिडिावर टाकली. या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक केलेल्या तरुणाने इंस्टाग्राम वर पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाचा उल्लेख करत पाकिस्तानी झेंडे आणि पाकिस्तानी असल्याचा गर्व आहे अशी पोस्ट टाकली होती. या तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हा तरुण मलकापूर येथील औषधनिर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.


पाकिस्तान स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा


14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वतंत्र दिन होता. मलकापूर येथील औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील मुजम्मिल खान अहमद खान या विद्यार्थ्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर " proud to be a pakistani आणि पाकिस्तानी झेंडे घेऊन पाकिस्तान स्वतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.


इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल


इंस्टाग्रामवर त्याची ही पोस्ट व्हायरल झाली. इंस्टाग्राम अकाऊंट वरून महाविद्यालयातील काही लोकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी या तरुणाला समजाऊन सांगितले. मात्र, त्याने उलट याच लोकांना धमकावून मी ही पोस्ट काढणार नाही, अस म्हटले. यानंतर महाविद्यालयातील त्याचे सहकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. मलकापूर शहर पोलिसांनी या प्रकरणी मुजममिल खान विरुद्ध भादवी 505 B , 502 (2) , 504,506 नुसार गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. या तरुणाला पोलिस ठाण्यात आणल्यानंतर  पोलिस स्थानकात मोठा जमाव जमा झाला होत. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने तणाव निवळला.


पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देणाऱ्या दोघांना अटक


स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे देण्यात आले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. पुण्यातल्या कोंढवा परिसरात हा प्रकार घडला. कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी सुरक्षा रक्षकाचं काम करणारे दोघे सोमवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तान जिंदाबादचे नारे देत होते. त्या ठिकाणाहून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्यांनी दिलेले हे नारे ऐकले. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.