मराठा समाजाला आरक्षण तत्काळ द्यावं: एकनाथ खडसे
आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं खडसे म्हणाले.
बीड: सद्यपरिस्थितीत मराठा समाजाला तात्काळ आरक्षण दिलं जावं, असं मत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे. पंढरपूरहून विठुरायाचं दर्शन घेऊन परतत असताना बीडमधल्या आष्टीमध्ये त्यांनी हे मत मांडलं. औरंगाबादच्या कायगाव टोका इथे रास्ता रोको सुरू असल्यानं त्यांना मार्ग बदलावा लागला. आष्टी पाथर्डी शेवगाव पैठण मार्गे ते औरंगाबादेत दाखल झाले. याच मार्गावर पाथर्डीमध्ये थांबवून त्यांचा सत्कार करण्यात आला.
आरक्षणाबाबतचा निर्णय न्यायालयात प्रलंबित असला तरी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहून तात्काळ मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवं असं खडसे म्हणाले.