मुंबई : पुण्यातल्या कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. यंत्रणांचा निष्काळजीपणा कारण ठरल्यचा आरोप करण्यात आलाय. ५ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कालवाफुटी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्ते विश्वम्भर चौधरी, विद्या बाळ आणि अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी ही याचिका दाखल केलीय. 


२७ सप्टेंबर रोजी पुण्यातील उजवा मुठा कालवा फुटला होता. या दुर्घटनेत सुमारे ५०० झोपड्यांचं नुकसान झालं. या घटनेला शासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची तक्रार या याचिकेद्वारे करण्यात आलीय. 


कालवाफुटी प्रकरणी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचं उल्लंघन झाल्याचं या याचिकेत नमूद करण्यात आलय. येत्या ५ ऑकटोबरला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.