बुलडाणा : पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा भारताने १२ दिवसानंतर बदला घेतला. भारतीय वायुसेनेने पाकिस्तानमध्ये घुसून बॉम्ब वर्षाकरीत हल्ला चढवला. या हल्ल्यात पाकिस्तान हद्दीतील बालाकोट येथील अतिरेक्यांचे अड्डे उद्धवस्त झालेत. यासाठी 'मिराज २०००' या लढावून विमानांचा वापर करण्यात आला. पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून अतिरेक्यांच्या तळावर हल्ला केल्याने ३०० च्या वर अतिरेकी ठार झालेत. या कारवाईनंतर देशात जल्लोष साजरा होत असताना शहीद जवानांच्या वडिलांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपल्याला याचा जास्त अभिमान आणि आनंद आहे, असे शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने आज माझ्या मुलाचाच नव्हे तर शहीद झालेल्या सर्वच सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा बदला घेततला आहे. याचा अभिमान आणि आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडिलांनी दिली आहे. पाकिस्तान सतत कुरापती करत असल्याने त्यांचा असाच बदला घेत रहावे, असंही त्यांनी म्हटले आहे. तर सतत हल्ले करणाऱ्या पाकिस्तानचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नीतीन राठोड यांच्या भावाने केली आहे. 


आज लष्कर-ए-तयबाच्या वेगवेगळ्या अड्ड्यांवर भारतीय वायू सेनेने हल्ले करून पाकिस्तानटे कंबरडे मोडल्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणारमध्ये फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. त्यानंतर शहीद जवान नीतीन राठोड यांच्या वडील आणि भावाने आपली प्रतिक्रिया दिली. भारताने असेच पाकिस्तानला चोख उत्तर दिले पाहिजे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याने आनंद वाटत आहे. पुन्हा पाकिस्तान कुरापती काढणार नाही, अशी अदद्ल त्यांना घडविण्याची गरज होती. ती या बालाकोट हल्ल्याने पूर्ण झाली आहे. या हल्ल्याचा आपल्याला अभिमान असे शहीद जवान नितीन राठोड यांच्या वडिलांनी म्हटले आहे.