पुण्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत धक्कादायक वाढ
पुण्यामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.
पुणे : पुण्यामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. एका दिवसामध्ये पुण्यातली कोरोनाच्या रुग्णांची संख्या १,२५१ ने वाढली आहेस, तर २५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात एवढे रुग्ण वाढण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यामध्ये सध्या कोरोनाचे २३,६८० रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत पुण्यात ७८८ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.
पुण्यात आज वाढलेल्या १,२५१ रुग्णांपैकी पुणे महापालिका क्षेत्रात ८६०, पिंपरी-चिंचवडमध्ये २८२, पुणे ग्रामीणमध्ये ६४ आणि पुणे कॅम्पमध्ये ४५ रुग्ण वाढले आहेत.