COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे : पुण्यातील आंबेगाव परिसरात भिंत कोसळून ६ मजूर ठार झाले आहेत. आंबेगाव परिसरातील हा लेबर कॅम्प येथेसीमा भिंत झोपड्यांवर कोसळून ही दुर्घटना घडली आहे. जवळच एका इमारतीचे काम सुरु असून मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून हे मजूर आले होते. दिवसभर कष्ट करुन हे मजूर पत्र्याच्या घरात झोपले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे. जखमींवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील दोन मुलं आणि त्यांचे आईवडिल अशा चौघांचा बळी गेला आहे. एनडीआरआफ आणि पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. 



दोन वर्षांपूर्वी ही भिंत बांधण्यात आली होती. भिंतीला लागून नागरिकांची घरं होती. भिंत कोसळून ६ मजूरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेमध्ये कामगारांच्या सुरक्षितेकडे दुर्लक्ष झाल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कबुल केले आहे. पुण्यातील आंबेगावमध्ये ही घटना घडलीय. बचावकार्य पहाटे साडेचारच्या दरम्यान थांबवण्यात आले आह. या घटनेत ४ जण किरकोळ जखमी होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.