पुण्यातील ओढ्यावरून राडा, नागरिकांच्या घरावर बुलडोजर
`घरंच गेल्यावर जायचं कुठे? आधी पर्यायी व्यवस्था करा`, नागरिकांचा आक्रोश
पुणे: पुण्यातील आंबिल ओढ्यावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. याचे पडसाद म्हणून नागरिकांनी तुफान राडा केला. याच दरम्यान पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली.
पुण्यात पोलीस आणि स्थानिकांमध्ये तुफान राडा झाला. आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोहोचले असता यावेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. इतकंच नाही तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील केला.
कारवाईसंबंधी कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आली नसल्याचं आंदोलकांनी झी 24 तासशी बोलताना सांगितलं. स्वत:चं घर गेल्यावर कुठे जायचं असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत. कारवाईच करायची असेल तर आधी पर्यायी व्यवस्था द्यावी त्यानंतर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली.