सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : देवाच्या मंदिरात घंटा सोडणारा चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी या चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी घंटा ताब्यात घेवून ती पुन्हा मंदिर प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली. पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही अजब चोरी झाली आहे. घंटा चोरणाऱ्या चोराचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे (Pune crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील कोंढवा परिसरात असलेल्या भैरवनाथ मंदिरातून घंटा चोरी झाल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी या घंटा चोरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. सोहेल इतियाज शेख ( वय 25 वर्षे) असे अटक आरोपीचे नाव आहे. सोहेल हा शिवाजीनगर येथील वडारवाडी परिसरात राहणारा आहे. 


असा सापडला घंटा चोर


भैरवनाथ मंदिरातून 3 घंटा चोरीला गेल्या होत्या. पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे याचा तपास सुरु केला. यावेळी अनोळखी आरोपी रिक्षामधुन (क्र. एम.एच. 12 OR 608)  घंटा चोरी करून नेत असल्याचे  CCTV फुटेजमध्ये दिसले. पोलिसांनी रिक्षा क्रमकांच्या आधारे रिक्षाच्या मालकाचा शोध घेतला. यावेळी ही रिक्षा सोहेल याला भाड्याने चालवायला दिल्याचे मुळ मालकाने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सोहल याला ताब्यात घेतले. यावेळी त्याने रिक्षाच्या डिकीमध्ये चोरलेल्या घंटा लपवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सोहले याने चोरलेल्या 3 घंटा ताब्यात घेतल्या आहेत. पैशांची गरज असल्याने या घंटा चोरल्याचे सोहेल याने पोलिसांना सांगितले. 



गावठी कट्टा बाळगणारा जेरबंद


अहमदनगर येथे गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुनिल मच्छिंद्र चव्हाण असे तरुणच नाव असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा 62 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गावठी कट्टा बाळगणाऱ्यावर कोतवाली पोलिसांची महिनाभरातील ही धडक दुसरी कारवाई आहे. शहरातील आनंदधाम गेट येथे एक तरुण संशयितरित्या मोटरसायकलवर थांबलेला असून त्याच्या कंबरेला गावठी कट्टा असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरून गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ही कारवाई केलीय. या आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.