अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : ब्राह्मण संघटनांचा विरोध डावलून पुण्यातील बहुतेक चित्रपटगृहांत दशक्रिया हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल वादाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट आज प्रदर्शित होईल, की नाही याबद्दल संभ्रम होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज मात्र हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण या संदर्भात कायदा हातात घेणार नसल्याचं ब्राह्मण संघटनांनी स्पष्ट केलं आहे. 


अनेकांनी या चित्रपटाचं बुकींग थांबवलं होतं


पुण्यातील चित्रपट गृह दशक्रिया दाखवणार नसल्याचा दावा ब्राह्मण संघटनांनी केला होता. किंबहुना चित्रपटगृह चालकांनीही तशी तयारी काल म्हणजे गुरूवारी दर्शवली होती. त्यानुसार अनेकांनी या चित्रपटाचं बुकींग थांबवलं होतं. 


कायदा हातात घ्यायचा नाही-ब्राह्मण संघटना


आज मात्र हा चित्रपट दाखवला जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. यांदर्भात कायदा हातात घेणार नसल्याचं ब्राह्मण संघटनांनी आधीच स्पष्ट केलं आहे.