Chinchwad Bypoll Election : मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणुकीची (Pune Bypoll Election) घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) केली होती. त्यानंतर आता पुण्यात जोरदार लढत पहायला मिळत आहे. चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) आणि नाना काटे (Nana kate) यांच्यात मुख्य लढत आहे. अशातच आता अश्विनी जगताप यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.


आश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाची नोटीस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपच्या चिंचवडच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडणूक आयोगाने पेड न्यूज (Paid News) प्रकरणात नोटीस बजावल्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आयोगाकडून त्यांना लेखी खुलासा करण्याचं सांगण्यात आलंय. पैसे देऊन बातमी प्रकाशित करण्यावरुन त्यांना नोटीस पाठवली आहे. अश्विनी जगताप यांना 16 फेब्रुवारीला नोटीस धाडण्यात आली. त्यानंतर आता 20 फेब्रुवारीला त्यांचा खुलासा करणं गरजेचं आहे.


पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी येत्या 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यामुळे आता येत्या काही दिवसात निवडणुकीचा जोरदार प्रचार पहायला मिळू शकतो. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक (Kasaba-Chinchwad Bypoll) दोन्ही गटांसाठी आता प्रतिष्ठेची झाल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


आणखी वाचा - Pune Fire : पुण्यातील भाजी मंडईला भीषण आग; 90 स्टॉल आगीत जळून खाक!


दरम्यान, भाजपकडून खुद्द देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मोर्चा सांभाळलाय. तर दुसरीकडे अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार रॉली काढत भाजपला आव्हान दिलंय. प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रा मोठ्या प्रमाणात काढल्या जात असल्याने येत्या 2 मार्चला निकाल कोणाच्या पारड्यात जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.