पुणे : पुण्यातही पावसाची संततधार सुरु आहे. खडकवासला धरणातून सध्या अकरा वाजल्यापासून 35574 क्यूसेस इतका विसर्ग चालू आहे. धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस चालू आहे. तसेच पानशेत आणि वरसगाव धरणे शंभर टक्के भरली आहेत. ( खालील सर्व अपडेट ४ ऑगस्ट, रविवार, दुपारी ३ पर्यंत) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे दोन्ही धरणातून अनुक्रमे 12936 आणि 9035 असा विसर्ग चालू आहे. पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढलेला आहे. दुपारी तीन वाजता खडकवासला धरणातून एकूण 41756 क्यूसेस इतका विसर्ग मुठा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.



पौड - मुळशी परिसरात पूरस्थिती


मुळशी धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं पौड - मुळशी परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुणे - मानगाव महामार्गावपाणी आल्यानं हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. 


तरीदेखील काही ठिकाणी पाण्यातून धोकादायक वाहतूक सुरु आहे. पौड गावात एका खोलीला पुराच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे ९ जण अडकले होते. 


स्थानिक नागरिकांनी दोरखंडाच्या साहाय्यानं त्यांची सुटका केली.


विश्रांतवाडी, शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी


पुण्यात गेले चार, पाच दिवसापासून पडत असलेल्या पावसाने अनेक भागात पाणी शिरले आहे. विश्रांतवाडी येथील शांतीनगर वसाहतीत पावसाचे पाणी घुसले आहे. 


दोन दिवस पाऊस सुरू असल्याने या भागात पाणी आल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. 


बाणेर स्मशानभूमी पाण्यात बुडाली


दरम्यान, झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या घरातील घुसल्याने लोकांना सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे. 


तर पिंपळे निलखच्या पूलाला पाणी लागले आहे. बाणेरची स्मशानभूमी पूर्णपणे पाण्यात बुडाली आहे.


भीमा नदीपात्रात 25 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू


उत्तर पुणे जिल्ह्याच्या भीमाशंकर भोरगिरी परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. चासकमान धरण तुडुंब झालं आहे. 


गेला आठवड्याभरापासून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या या परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. 


चासकमान धरणातून भीमा नदीपात्र 25  हजार क्‍युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे भीमा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.


पिंपरी चिंचवड शहरातले जनजीवन विस्कळीत


मुसळधार पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातले जनजीवन विस्कळीत झालं दरम्यान मुठा नदीतून सुरू असलेल्या विसर्गामुळे वाकडमध्ये स्मशान भूमीमध्ये पाणी शिरले. त्यामध्ये एक कुटुंब आणि तरुण अडकून पडला. वाकड पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने चौघांची सुटका केलीय..! 


दरम्यान पवना धरण 100 टक्के भरले असून धरणातून 13 हजार 700 कुसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे, त्यामुळे नदी काठच्या झोपडपट्ट्यामध्ये पाणी घुसले आहे...! 


सांगवी, दापोडी, सुभाषनगर भागात पाणी घुसले आहे...! अनेक ठिकाणी रस्त्यावर गुडघाभर पाणी साठले आहे...! काही भागात रात्रीपासून वीज गायब झाली आहे..!  मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे...!