Pune Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याच आई वडिलांना धमकावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) उघडकीस आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी (Pune Police) याप्रकरणी एका 25 वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार (physical abuse) करुन तिच्या आई वडिलांकडून पाच हजार रुपये उकळले आहेत. या सर्व प्रकारानंतर एकच खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 फेब्रुवारी ते 15 मार्च 2023 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचे फोटो काढले होते. त्यानंतर तिच्या आई वडिलांना हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच हजार रुपये देण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या पालकांकडून पैसे उकळल्यानंतर आरोपीने मुलीच्या आईला हे फोटो पाठवले होते.


या सर्व प्रकारानंतर पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर हिंजवडी पोलिसांनी रोशन कैलास चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दखल केला आहे. हा सर्व प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.


नेमकं काय घडलं?


पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी रोशन चव्हाण यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपीने मुलीसोबत अत्याचार करुन तिचे अश्लिल फोटो काढले. यानंतर मुलीच्या आईकडे मला पैसे द्या नाहीतर तर फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली आणि पाच हजार रुपयांची मागणी केली. यानंतर अल्पवयीन मुलीच्या आई वडिलांनी बदनामीच्या भीतीने आरोपीला ऑनलाईन पाच हजार रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर आरोपीने ते फोटो मुलीच्या आईला पाठवले.


दुसरीकडे, त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी आरोपीविरोधात पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. हिंजवडी पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत तरुणावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.