सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune) एका फिल्मी स्टाईल घटनेच्या चोरीचा (Film Style Theft) उलगडा करण्यात पोलिसांना (Pune Police) यश आलं आहे. एका टोळीने तब्बल 1 कोटी रुपयांचं 200 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले होते. दागिन्यांबरोबरच परदेशी चलन, मौल्यवान घड्याळं आणि इतर वस्तूंचीही या टोळीने चोरी केली. पण पोलिसांनी सखोल तपास करत तीन दोन महिला आणि एका पुरुषाला अटक केली आहे. त्यांच्याकडून 80 तोळं सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. ( 1 crore gold jwellery stolen from pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे नेमकं प्रकरण
पुण्यातली उच्चभ्रू भाग असलेल्या पाषाण भागातील सिंध सोसायटीमध्ये चोरीचा ही घटना घडली. समीर दयाल यांचा सिंध सोसायटीत बंगला आहे. चोरी करणाऱ्या टोळीची या बंगल्यावर नजर होती. अनेक दिवस त्यांनी या बंगल्याची रेकी केली. या टोळीतील महिला बीड आणि जालना जिल्ह्यातील आहेत. भिकारी बनून त्या महिला दयाल यांच्या बंगल्याच्या आसपास भिक मागत असत. अनेक वेळा या महिला अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन भिक मागताना दिसल्या.


भिकारी असल्याने दयाल यांच्या बंगल्यातील काही जण अनेक वेळा त्यांना खाणं-पिणं देत होते. याचा गोष्टीचा फायदा घेत भिकारी बनलेल्या माहिलांनी बंगल्यात काय काय आहे याची माहिती घेतली. बंगल्यात किती लोकं आहेत, ते बाहेर कधी जातात, पुन्हा बंगल्यात कध परतात याची सर्व माहिती त्यांनी जमवली. 11 डिसेंबरला दयाल यांच्या बंगल्यातील सर्वजण काही कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेले. 


हीच संधी साधत भिकारी बनलेल्या टोळीने बंगल्याच्या मागच्या बाजूने खिडकीचे गज कापत बंगल्यात प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील 1 कोटी किंमतीचं 200 तोळं सोनं, मौल्यवान घड्याळं, आणि इतर महागड्या वस्तू या टोळीने जप्त केल्या. दयाल कुटुंब घरी परतल्यावर त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी चतुश्रुंगी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला. यासाटी त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केला. यात काही महिला संशयास्पद आढळल्यानंतर त्यांनी त्यादिशेने तपास केला.


चोरीच्या घटनेनंतर परिसरात दिसणाऱ्या त्या भिकारी महिला गायब झाल्या होत्या. पोलिसांनी तपास करत 2 महिलांसाह एक अल्पवयीन मुलाला अटक केली. या टोळीतील 1 पुरुष आणि एका महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये खुशबू गुप्ता, अनु आव्हाड, महावीर चपलोत अशी नावं आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.