सागर गायकवाड, झी मीडिया, पुणे : पुण्यात (Pune Crime) एक मोठं हत्याकांड समोर आले आहे. पुण्यात एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करुन स्वतःला संपवलं आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अमरावती पोलीस (Amaravati Police) दलात कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावती पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्त भारत गायकवाड यांनी पुण्यात राहणाऱ्या पत्नीचा आणि पुतण्याचा गोळी झाडून खून केला आहे. खुनानंतर भरत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्याही केली. मध्यरात्री चार वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. स्थानिक पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.


पत्नी मोनी गायकवाड (वय 44), पुतण्या दीपक गायकवाड (वय 35) अशी गोळी झाडून खून केलेल्या दोघांची नावे आहेत. तर भारत गायकवाड यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.भारत गायकवाड हे अमरावती पोलीस दलात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यांचे कुटुंबीय पुण्यात वास्तव्याला होते.


मारहाणीमुळे गर्भवती महिलेनं गमावलं बाळ


लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक नळातून पाणी भरण्याच्या वादातून शेजाऱ्यांनी मारहाण केल्यामुळे एका 25 वर्षीय महिलेने तिचे तीन महिन्यांचे बाळ गमावलं आहे. वाघोली येथील गायरान गोरेवस्ती येथील पीडित महिला सकाळी सात वाजता घराजवळील सार्वजनिक नळावरून पाणी आणण्यासाठी रांगेत उभी असताना ही घटना घडली. महिलेचा नंबर आल्यानंतर पीडितेने तिची बादली नळाखाली ठेवली आणि पाणी भरायला सुरुवात केली. पण तिचा शेजारी रोहित रवी धोत्रे हा अचानक आला आणि तिची बादली काढून नळाखाली त्याची बादली ठेवली.


यावरून पीडित महिला आणि धोत्रे यांच्यात बाचाबाची झाली. यादरम्यान धोत्रेचे वडील आणि आई शांताबाई घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने धोत्रे याने पीडितेला चापट मारली आणि तिच्या पोटावर लाथ मारली. पोटात प्रचंड दुखू लागल्याने पीडित महिला खाली पडली. त्यानंतर रात्री तिच्या गर्भाशयातून रक्त येऊ लागले. तिच्या पतीने तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेले तेथून तिला ससून रुग्णालयात हलवण्यात आले. जखमांमुळे तिचा गर्भ नष्ट झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.