Pune Crime News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी! ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार ललित पाटील फरार
Drug racket In Sassoon hospital : दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून ललित (Lalit Patil) ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय.
Pune Crime News : पुण्यातील ड्रग रॅकेटचा (Drug racket) सूत्रधार असलेला ललित पाटील (Lalit Patil) ससून रुग्णालयातून पळून गेलाय. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ललित सोमवारी रात्री आठच्या सुमारास फरार झाल्याची माहिती आता समोर आली आहे. ललित पाटील हा पुण्यातील ड्रग्ज रॅकेटचा सूत्रधार आहे. येरवडा जेलमधील कैदी असलेल्या ललितवर गेल्या 3 जूनपासून ससूननमध्ये (Sassoon hospital) उपचार सुरू होते. ससूनमधून तो ड्रग्जचं रॅकेट चालवत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पोलिसांनी (Pune Police) थेट कारवाई करण्यास सुरूवात केली होती.
दोन दिवसांपूर्वी ससून रुग्णालयाच्या (Drug racket In Sassoon hospital) गेटवर 2 कोटींचं ड्रग्ज सापडलं होतं. ससून रुग्णालयातून तो ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळालीय. दरम्यान, त्याच्या ससूनमधील मुक्कामामागे काही अर्थकारण आहे का?, याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केलीय. ललितला पुन्हा कारागृहात पाठवण्यासाठी येरवडा कारागृहानं ससून हॉस्पिटलला तब्बल चार पत्र पाठवली होती, अशी माहिती आता समोर आलीय.
दोन दिवसापूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे. सुमारे 1 किलो 75 ग्रॅमचे मेफिड्रोन ड्रग्ज ताब्यात घेण्यात आले आहे. MD म्हणजेच या मेफिड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे तब्बल 2 कोटी रुपये एवढी आहे. मात्र, ससून रुग्णालय परिसरात हे ड्रग्ज आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते. ललित पटेल हा कुख्यात आरोपी असून ड्रग्जची तस्करी केल्याप्रकरणी त्याला या आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर,त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली होती.
आणखी वाचा - Pune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
दरम्यान, मेफिड्रोनप्रकरणी हाय प्रोफाईल रॅकेट असून आरोपी ललित पटेल आणि आणखी 2 तरुण यात सहभागी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. ससून रुग्णालयातील कोणी कर्मचारी या प्रकरणात आहे का? येथील स्टाफचा संबंध आहे का? या अनुषंगाने देखील पोलीस तपास सुरू आहे. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी या संबंधीची माहिती दिली होती. मात्र, आता ललित पाटील याने पोलिसांच्या हातावर तुरी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.