पुणे : पुण्यातून एक विचित्र आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एक महिला कर्मचाऱ्यानी आपल्या पुरुष सहकाऱ्याच्या मानसिक छळाला आणि त्रासाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या महिलेनं आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला सुसाईड नोट लिहून पाठवली आणि स्वत:ला गळफास लावून घेतला. या पिडितेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली असता. गुन्हेगारा विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, या पिडित महिलेचं लग्न ठरलं होतं.  तिचा 31 ऑक्टोबरला साखरपुडा झाला होता आणि 16 नोव्हेंबरला लग्न होणार होतं. ज्यामुळे ती आपल्यामुळ गावी आली होती. परंतु त्यानंतर तिने मंगळवारी म्हणजे 2 ते 3 नोव्हेंबरदरम्यान आपल्या सहकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली.



पिडितेची ओळख तिच्या सहकाऱ्यासोबत दोन वर्षापूर्वी झाली होती. त्यानंतर तिचा पुरूष सहकारी तिला नेहमी मानसिक आणि शारिरीक त्रास देऊ लागला. या सगळ्याला मागे टाकत जेव्हा पिडितेनं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा या पोलिस सहकाऱ्यानं तिला धमकी देण्यास सुरवात केली आणि सांगितले की, तुझ्या वडिलांना मारुन टाकेण, तसेच तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला देखील मी आपल्याबद्दल सांगेन.


अखेर त्यानं नुसतीच धमकी न देता पिडितेच्या घरच्यांना फोन केला आणि पिडितेचं लग्न थांबवण्यासाठी सांगितले आणि जिवे मारण्याची धमकी देखील दिली. ज्यामुळे पिडिता घाबरली. तिच्या घरच्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तिने आत्महत्या केली.


त्यानंतर बहिणीच्या Whatsaap वरील सुसाईड नोट दोखवत पिडितेच्या भावाने यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल गेला. त्यांनतर पुणे ग्रामिण पोलिस अधिकारी ए. देशमुख आणि बारामतीचे अप्पर अधिरक्षक एम. मोहित यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच या आरोपी विरोधाक कारवाई देखील सुरू केली आहे.