पुण्यात कोयत्या गँगला पोलिसांचाही धाक उरला नाही, पती-पत्नीवर कोयत्याने हल्ला
पुण्यात दर एक दिवसााड कोयत्या गँगच्या दहशतीच्या घटना घडत आहेत, पोलिसांनी कारवाईकेल्यानंतरही कोयत्या गँगच्या उचापती काही केल्या थांबताना दिसत नाहीत, त्यामुळे नगारिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे
पुणे : पुण्यात (Pune) कोयता गँगची (Koyta Gang) दहशत काही केल्या थांबत नाहीए, आता तर त्यांना पोलिसांचीही (Pune Police) भीती उरली आहे की नाही असा प्रश्न उभा निर्माण झालाय. काल रात्री कोयता गँगने एका ज्येष्ठ नागरिकावर कोयत्याने हल्ला केला (Koyta Gang Attack on Senior citizen). जुन्या भांडणात राग मनात धरून कोयता गँगने पती-पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. शिवाजीनगर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयसमोर (Shivaji Nagar NCP Office) हा धक्कादायक प्रकार घडला. जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव सतीश काळे असं असून कोयता गँगच्या काही आरोपींबरोबर चार महिन्यांपूर्वी त्यांचा किरकोळ वाद झाला होता. या भांडणाचा राग मनात धरत कोयत्या गँगच्या चौघांनी सतीश काळे यांच्यावर कोयत्याने वार केले.
याप्रकरणी दादा बगाडे, दीपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या कोयता गँगच्या चौघांवर शिवाजीनगर पोलीस स्थानकात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समोरील मैदानावर रात्री झोपले होते. यावेळी हातात कोयते घेऊ चारही आरोपी जोरजोरात ओरडत आले आणि त्यांनी सतीश काळे यांच्यावर हल्ला केला.
लग्नातील वादातून तरुणावर हल्ला
दरम्यान, पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नात नाचताना झालेल्या वादातून चार जणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केला. आरोपींनी तरुणाला आधी हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली. त्यानंतर कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला. पुण्यातील हडपसर भागात ही घटना घडली. याप्रकरणी आरोपी तरुणांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Koyta Gang Attack on Young Boy)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार तरुण हा सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नकार्यासाठी गेला होता. यावेळी मुख्य आरोप अमरदीप जाधव आणि त्याचे मित्र या सोहळ्यात नाच होते. नाचताना तक्रारदार तरुण आणि अमरदीपमध्ये भांडण झालं. 15 जानेवारीला पुण्यात अमरदीप जाधव याच्यासह तीन जणांनी तक्रारदार तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले.