Crime News : पुण्यात (Pune) मन सुन्न करणारी एक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या पोटच्या चार वर्षांच्या मुलीची हत्या (Mother Killed Daughter) केल्याची घटना घडली आहे. कल्पी महेश वाडेर असं निर्दयी आईचं नाव आहे. पोलिसांनी आरोपी कल्पी हिला ताब्यात घेतलं आहे (Police Arrest Accused Women). सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास हडपसर इथल्या सिद्धिविनायक दुर्वांकुर सोसायटी ससाणे नगर इथं ही दुर्देवी घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कल्पी आणि तिची चार वर्षांची मुलगी हे दोघंच रहात होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महिन्याभरापूर्वीच आरोपी महिला आणि तिची मुलगी दुर्वांकूर सोसायटीत राहण्यात आले होते. बेकरी प्रोडक्ट विक्रीची व्यवसाय ही महिला करत होती. सोमवारी आरोपी महिला भाड्याचं घर खाली करणार होती. त्यामुळे घर मालक त्या ठिकाणी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद असलेला दिसला. दरवाजा ठोठावूनही ती उघडत नसल्याने घर मालकाने ही माहिती शेजारच्यांना दिली. शेजारच्यांनीही आरोपी महिलेला घराचा दरवाजा उघडण्यास सांगितलं. बऱ्याच वेळानंतर अखेर आरोपी महिलेने दरवाजा उघडला. 


दरवाजा उघडताच आतलं दृश्य बघून घरमालक आणि शेजारी हादरले. चार वर्षांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. आरोपी महिलेने आपल्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली होती. तीने आपल्या मुलीची हत्या का केली, याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.


कौटुंबिक वादातून जावयाकडून सासू आणि मेहुणीवर हल्ला
दरम्यान नाशिकमध्ये (Nashik) किरकोळ कारणावरुन एका जावयाने आपली सासू आणि मेहुणीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. पंचवटी परिसरातील पेठरोड भागात ही घटना घडली. या हल्ल्यात दोघीही गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अरुणा लोंखडे असं सासूचं नाव असून आरती वालझाडे असं जखमी मुलीचं नाव आहे. 


संशयित आरोपी मनोहर सोमनाथ मोंढे याचे पत्नीसोबत कौटुंबिक वाद आहेत. या वादाला आरती वालझाडे ही कारणीभूत असल्याचा संशय आरोपी मनोहरच्या डोक्यात होता. याच रागातून आरोपी मनोहरने अरुणा आणि आरतीवर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात आरती गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मनोहरला अटक केली आहे.